सांगलीतील महिला बुद्धिबळ स्पर्धेत केन चेस अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
इचलकरंजी :
सांगली येथे नूतन बुद्धिबळ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 20 व्या सौ. मीनाताई शिरगावकर स्मृती खुल्या महिला जलद बुद्धिबळ स्पर्धेत इचलकरंजी व जयसिंगपूर येथील केन चेस अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
खुल्या गटात सिद्धी बुबने हिने 12 वा क्रमांक मिळवला, तर नारायणी घोरपडे (20 वा), सांची चौधरी (21 वा), रेश्मा नलवडे (22 वा), शनाया मालानी (27 वा) आणि मृणाल पांडव (28 वा) यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत प्रत्येकी एक हजार रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र प्राप्त केले.
सात वर्षांखालील गटात अद्विता देसाई हिने तृतीय क्रमांक पटकावत ट्रॉफी व 300 रुपये बक्षीस मिळवले, तर कांची हुलीकिरे हिला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
नऊ वर्षांखालील गटात मुद्रा पाटील, सेजल जाजुंदा आणि कनक जाजुंदा यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
अकरा वर्षांखालील गटात श्रुती पांडव हिने प्रथम क्रमांक मिळवत 500 रुपये व ट्रॉफी पटकावली. तसेच प्रज्ञा पोरलेकर, गार्गी गुरव आणि मनस्वी शिरगुरे यांनाही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
तेरा वर्षांखालील गटात धनश्री पोरलेकर हिला 400 रुपये व ट्रॉफी, निधी पाटील हिला 300 रुपये व ट्रॉफी, मीरा गणपुले हिला 200 रुपये व ट्रॉफी देण्यात आली. तसेच मैथिली केने आणि जीविका जाजुंदा यांनाही ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
पंधरा वर्षांखालील गटात पूर्वा कुलकर्णी हिला 200 रुपये व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याशिवाय पूर्वा पाटील, सई बुबने आणि श्रेया हबीब यांनीही स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंना केन चेस अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक रोहित महादेव पोळ (फिडे डी.आय. व वरिष्ठ राष्ट्रीय पंच) यांचे मार्गदर्शन लाभत आहे. स्पर्धेतील या यशाबद्दल सर्व खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांचे इचलकरंजी व जयसिंगपूर परिसरातून अभिनंदन होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






