ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत कामगारांसाठी रुग्ण सेवा व सुश्रुषा केंद्र सुरू होणार : प्रकाश आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत कामगारांसाठी रुग्ण सेवा व सुश्रुषा केंद्र सुरू होणार : प्रकाश आवाडे

इचलकरंजी :
शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य कामगारांच्या आरोग्य सुविधांसाठी एमएसएमई अंतर्गत कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या माध्यमातून रुग्ण सेवा व सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली.
येथील श्री शंभुतीर्थ परिसरात समस्त धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आवाडे म्हणाले, इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून हजारो कामगार येथे कार्यरत आहेत. राज्याच्या विविध भागांतून रोजगारासाठी आलेली अनेक कामगार कुटुंबे शहरात वास्तव्यास आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कामगारांची संख्या आणखी वाढणार असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुषमा पुजारी यांच्या सहकार्याने रुग्ण सेवा व सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
या केंद्रामध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या तसेच घरी सेवा-सुश्रुषेची सुविधा उपलब्ध नसलेल्या रुग्णांची देखभाल, औषधोपचार व आवश्यक आरोग्य सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.
यावेळी शहापूर चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली. कार्यक्रमास डॉ. सुषमा पुजारी, विठ्ठल चोपडे, रवी रजपुते, राजू पुजारी, ध्रुवती दळवाई, विद्या लवटे, अमृत भोसले, ओंकार सुर्वे, अभिषेक वाळवेकर, सुशांत कलागते, नागेश पाटील आदी उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे व पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा