शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष; ४९ गुंतवणूकदारांची २.२५ कोटींची फसवणूक इचलकरंजी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून इचलकरंजीतील ४९ गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी २५ लाख ५७ हजार ९७२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यंकटरमण ओमप्रकाश शिरापूरम (रा. सुंगधा पाटील मळा, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहसिन कादर मणेर (रा. आयकॉन पार्क, आमराई रोड, इचलकरंजी) आणि मुदस्सर जमीर मकानदार (रा. इचलकरंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२२ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत सोन्या मारुती मंदिरासमोरील ‘ट्रेडिंग पॉईंट’ कार्यालयातून आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ८ टक्के नफा मिळेल, असे सांगून नागरिकांकडून पैसे गोळा केले. सुरुवातीच्या काही महिन्यांत परतावा देऊन त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीसह अन्य ४८ जणांकडून ऑनलाइन व्यवहार, आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे कोट्यवधी