ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात,माधुरी केस्तीकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना अभिवाचनाचे प्रात्यक्षिक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात,माधुरी केस्तीकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना अभिवाचनाचे प्रात्यक्षिक

इचलकरंजी (प्रतिनिधी) :

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिरमध्ये गुरुवारी (दि. १५) वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या निवेदिका माधुरी केस्तीकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माधुरी केस्तीकर व ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी केस्तीकर यांचा सत्कार ग्रंथालयाच्या माजी उपाध्यक्षा व संचालिका हर्षदा मराठे यांच्या हस्ते करण्यात आला.

लायन्स क्लब व आपटे वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाचन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माधुरी केस्तीकर यांनी विद्यार्थ्यांकडून कविता व गद्य उताऱ्यांच्या अभिवाचनाचे प्रात्यक्षिक करून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची नवी अनुभूती मिळाली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथालयाचे उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे यांनी केले. कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी मार्गदर्शक शिक्षिका वर्षा निशाणदार, ग्रंथपाल सीमा नेजे व वर्गशिक्षक प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विजेत्या विद्यार्थ्यांच्या वतीने शतायु मनीष पुजारी याने भावना व्यक्त केल्या. गोविंदराव हायस्कूलच्या सातवी ‘अ’ वर्गातील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. प्रा. मोहन पुजारी यांनी आभार मानले.

माधुरी केस्तीकर यांचे स्वागत करताना हर्षदा मराठे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा