व्याजाच्या पैशासाठी महिलेला देहव्यवसायास भाग पाडल्याचा आरोप; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी :
व्याजाच्या पैशासाठी तगादा लावत एका महिलेला जबरदस्तीने देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून त्यातून आर्थिक लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्यानुसार, आरोपी सर्जेराव कुंभार (रा. लक्ष्मीमाळ, कबनूर, ता. हातकणंगले), एक महिला व विनायक पवार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचा अपघात झाल्याने तिला पैशांची गरज निर्माण झाली होती. त्यावेळी तिने आरोपी महिलेकडून ७ हजार रुपये उसणे घेतल्याचा आरोप आहे. संबंधित रक्कम वेळेत परत न केल्याने तिच्याकडून व्याजासाठी तगादा लावण्यात येत होता.
तक्रारीनुसार, व्याजाचे पैसे न दिल्यामुळे पीडित महिलेला आरोपींनी जबरदस्तीने कामावर ठेवले. त्यानंतर आरोपी सर्जेराव कुंभार व महिलेने संगनमत करून तिचा मानसिक छळ केला तसेच ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यातून पैसे घेतल्याचा आरोप आहे. तसेच विनायक पवार याने ग्राहक उपलब्ध करून दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





