ICHMH51NEWS.IN
9921600800

सहा वर्षांपासून बंद असलेला शहीद भगतसिंग जलतरण तलाव तात्काळ सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा- उदयसिंग पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सहा वर्षांपासून बंद असलेला शहीद भगतसिंग जलतरण तलाव तात्काळ सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा- उदयसिंग पाटील

इचलकरंजी :
शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक, जलतरणपटू, महिला बॅच, विद्यार्थी तसेच नियमित जलतरण करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला शहीद भगतसिंग जलतरण तलाव सन २०२० पासून बंद अवस्थेत असून तो तात्काळ सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आलेल्या मागणीनुसार, तब्बल सहा वर्षे जलतरण तलाव बंद असल्यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय होत असून महानगरपालिकेलाही मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. या तलावातून दरवर्षी सुमारे १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते तसेच सुमारे ४०० सभासद या सुविधेचा लाभ घेत होते. या कालावधीत अंदाजे ९० लाख रुपयांचे उत्पन्न गमावल्याचा दावा करण्यात आला आहे.
सध्या महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि आयुक्त अशी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असतानाही तलावाचे काम रखडल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
जलतरण तलावातील फरशी बसविणे, संरक्षक भिंत उभारणे, बाथरूम दुरुस्ती, जिना व पाईपलाईन, विद्युत व्यवस्था तसेच तलावाची खोली कमी करण्याची कामे अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, प्रभाग क्रमांक १४ मधील या जलतरण तलावाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. संबंधित काम पूर्ण झाल्याचे सांगून बिलही अदा करण्यात आले असल्याचा दावा करत, तरीही तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
शिव-शाहू विकास आघाडीने उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून जलतरण तलाव नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी केली असून अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

भगतसिंग जलतरण तलावाची पाहणी करताना उदयसिंग पाटील व शिव शाहू आघाडीचे पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा