ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहराचा २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान पाणीपुरवठा बंद जलवाहिनी जोडणी व गळती दुरुस्तीची कामे हाती घेणार; नागरिकांना पाणीसाठा करण्याचे आवाहन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहराचा २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी जोडणी व गळती दुरुस्तीची कामे हाती घेणार; नागरिकांना पाणीसाठा करण्याचे आवाहन

 

इचलकरंजी/प्रतिनिधी : इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी जोडणी, दाबनलिका बदलणे आणि विविध ठिकाणच्या पाणीगळती दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवार, दि. २४ ते सोमवार, दि. २६ ऑक्टोबरदरम्यान शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

या कालावधीत मजरेवाडी जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची अशुद्ध पाण्याची दाबनलिका बदलणे, कृष्णा जलवाहिनीच्या वितरण नलिकेची जोडणी करणे तसेच शहरातील विविध भागांतील पाणी वितरण नलिकांवरील गळती दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

शहराची पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे, या उद्देशाने ही कामे हाती घेण्यात येत आहेत.

पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन इचलकरंजी महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न

आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश आवाडे, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र आरेकर १३ इमारतींच्या गृहप्रकल्पातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न