ICHMH51NEWS.IN
9921600800

विनानंबरप्लेटची दुचाकी घेऊन फिरणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात,इचलकरंजी शहर वाहतूक शाखेची कारवाई; २५ हजारांची मोटारसायकल जप्त 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विनानंबरप्लेटची दुचाकी घेऊन फिरणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात,इचलकरंजी शहर वाहतूक शाखेची कारवाई; २५ हजारांची मोटारसायकल जप्त 

इचलकरंजी :
 शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नियमित पेट्रोलिंगदरम्यान गंगानगर रोडवर विनानंबरप्लेटची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्या एका ४० वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहु बोजा जावीर (वय ४०, रा. फकीर रोड, उदगाव, जयसिंगपूर; मूळ रा. लोनार, पो. हुन्नूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
शहर वाहतूक शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोरवी आणि पोलीस अंमलदार निलेश महादेव डोंगरे हे २३ ऑक्टोबर रोजी नियमित पेट्रोलिंग करत असताना गंगानगर रोडवर एक व्यक्ती विनानंबरप्लेटच्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलसह आढळून आला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीला थांबवून वाहनाच्या क्रमांकाबाबत व मालकीबाबत विचारणा केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
सदर मोटारसायकलच्या पुढील व मागील बाजूस नंबरप्लेट नव्हती. तसेच वाहनाचा चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांकही दिसून येत नसल्याने पोलिसांनी संशयितासह मोटारसायकल ताब्यात घेतली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोरवी आणि पोलीस अंमलदार निलेश डोंगरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा