ICHMH51NEWS.IN
9921600800

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेसमोर ठिय्या! तीन महिन्यांचे वेतन थकीत; बोनसही रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेसमोर ठिय्या! तीन महिन्यांचे वेतन थकीत; बोनसही रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप

इचलकरंजी :
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी थकीत वेतन आणि बोनसच्या मागणीसाठी महापालिकेच्या सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी महापालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महापालिका कंत्राटी कामगार युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेतील ३५ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन, २७९ सफाई कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस, तसेच घंटागाडीवरील ८० ते १०० कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन आणि बोनस थकीत असल्याचे सांगण्यात आले.
दिवाळीतही वेतन आणि बोनस न मिळाल्याने सण साजरा करायचा कसा, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी उपायुक्तांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मुदतीत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष ए. बी. पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा