श्रीमंत नारायणराव घोरपडे यांना महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन
इचलकरंजी : इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नाट्यगृह परिसरातील पुतळ्यास आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेवक अमरजित जाधव, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त रोशनी गोडे, सुनील शिंदे, रामचंद्र कांबळे, नितीन बनगे, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.







