ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर SVEEP अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर SVEEP अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) उपक्रमांतर्गत आज गुरुवार दिनांक १ जानेवारी रोजी राजाराम स्टेडियम येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 आजच्या मतदान जनजागृती कार्यक्रम महानगरपालिका उपायुक्त नंदू परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत
तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी, शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग  त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    मतदान हा लोकशाहीतील मूलभूत हक्क व कर्तव्य असल्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.
 यावेळी मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने घोषणाही देण्यात आल्या.
      याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच आपण स्वतः मतदान करणार असून आपल्या कुटुंबीयांना, शेजारी व संबंधित प्रत्येक नागरिकाला मतदानासाठी प्रोत्साहित करू, असे आवाहन सर्वांनी केले. याबाबत उपस्थित सर्वांनी प्रत्यक्ष कृती करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी SVEEP कमिटीचे प्रमुख कासार साहेब, नोडल अधिकारी शंकर पवार, सूर्यकांत शेटे, सुनील शिंदे, घोडके सर, सचिन खोंद्रे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदान जागृती दरम्यान घेतलेले छायाचित्र

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा