भुयारी गटार योजनेतील निकृष्ट कामांची प्रशासनाकडून दखल; मक्तेदाराला नोटीस
इचलकरंजी :
शहरातील ५२० कोटींच्या भुयारी गटार योजनेतील निकृष्ट दर्जाची कामे, रस्ता पुनर्स्थापनेतील त्रुटी तसेच कामातील हलगर्जीपणाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेत संबंधित मक्तेदाराला समज नोटीस बजावली आहे.
भाजपा इचलकरंजीचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडे निवेदन देऊन निकृष्ट कामांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित कामाची पाहणी करून कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
महापालिकेचे अभियंता अभय शिरोलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने मक्तेदाराला नोटीस देऊन सर्व त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नोटीसमध्ये कामाचा दर्जा सुधारला नाही तर संबंधित कामाचे मूल्यमापन करण्यात येणार नाही तसेच पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे भुयारी गटार योजनेच्या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन अधिक कठोर भूमिका घेणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







