इचलकरंजी महापालिका वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून स्वच्छता जनजागृती रॅली उत्साहात पार पडली.
रॅलीचा शुभारंभ उपमहापौर अनिल डाळ्या व स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते झाला. यावेळी उपायुक्त नंदु परळकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत व सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे उपस्थित होते.
रॅलीदरम्यान “स्वच्छ शहर, सुंदर शहर”, “कचरा घंटागाडीतच टाका”, “ओला व सुका कचरा वेगळा करा”, “स्वच्छता हीच सेवा” अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात आली.
स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्वच्छता रॅली दरम्यान पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






