ICHMH51NEWS.IN
9921600800

अधिक मासातील आध्यत्मिक सेवांचे पुण्य पदरात पाडून घ्या : गुरुपुत्र चंद्रकांतदादा माेरे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह साेहळ्याच्या प्रचार-प्रसारानिमित्त कार्यक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक मासातील आध्यत्मिक सेवांचे पुण्य पदरात पाडून घ्या : गुरुपुत्र चंद्रकांतदादा माेरे
श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह साेहळ्याच्या प्रचार-प्रसारानिमित्त कार्यक्रम

इचलकरंजी:

भक्ती, संस्कार आणि अध्यात्माची जाेपासना करण्यासाठी अशा धार्मिक उपक्रमांची समाजाला माेठी गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिंडाेरी प्रणित सेवा मार्ग समाजातील दुःखीत पिडीतांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहे, महिलांना अध्यात्मिक क्षेत्रात शंभर टक्के आरक्षण देण्याचे कार्य मार्गाने केले आहे. अधिक मासात आयाेजित केलेल्या विविध अध्यात्मिक सेवांमध्ये सहभागी हाेण्याचे आवाहन करताना अधिक मासातील आध्यत्मिक सेवांचे पुण्य पदरात पाडून घ्या, असे आवाहन गुरुपुत्र चंद्रकांतदादा माेरे यांनी यांनी केले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह 5 ते 12 जून या कालावधीत संपन्न हाेत आहे. या धार्मिक साेहळ्याच्या प्रचार-प्रसारानिमित्त येथील पद्मप्रताप मल्टिपर्पज हाॅल येथे गुरुपुत्र चंद्रकांतदादा माेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांनी श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले. मुलांवर याेग्य संस्कार, विवाह समस्या, व्यसनमुक्ती, ग्राम अभियान यांचा सखाेल उल्लेखही केला.
दरम्यान, इचलकरंजी येथील दिंडाेरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नदीवेस नाका येथे आमदार राहुल आवाडे, महापाैर उदय धातूंडे, उपमहापाैर अनिल डाळ्या, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मंगळवार पेठ, मधूबन साेसायटी येथील सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या.
कार्यक्रमास इचलकरंजी सेवा केंद्र प्रमुख रमेश शिरगुरे यांच्यासह मान्यवर मंडळी, सेवेकरी भाविक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांचा सन्मान करताना आ.राहुल आवाडे,महापौर उदय धातूंडे,सतीश मुळीक,रुपा बुगड
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा