ICHMH51NEWS.IN
9921600800

केसरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केसरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

*इचलकरंजी :
येथे केसरी ढोल-ताशा पथकाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली “केसरी प्रीमियर लीग-पर्व ०४ थे ” क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली. स्पर्धेमध्ये केसरीचे शिलेदार, पैठणी इलेव्हन्स, तेजस स्ट्रायकर्स, सैरा वॉरियर्स व लायन किंग्स या पाच संघांनी व ६५ खेळाडूंनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. दिवसभर रंगलेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
            अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. यात केसरीचे शिलेदार संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर पैठणी इलेव्हन्स संघाने उपविजेतेपद मिळवले. विजेत्या आणि उपविजेत्या संघांस रोख रक्कम व भव्य ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज-अभि आरगे, तर उत्कृष्ट गोलंदाज-जयेश कार्वेकर यांना सन्मानचिन्ह व आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
            बक्षीस वितरण समारंभाला परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले व क्रिकेटच्या माध्यमातून युवकांना चांगल्या व्यासपीठाची उपलब्धता करून दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. खेळाच्या माध्यमातून युवकांमध्ये एकोप्याची भावना, शिस्त आणि खेळाडूवृत्ती वाढीस लागते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, पंच, स्वयंसेवक तसेच सर्व केसरीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजेता व उपविजेता संघ.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा