महापालिका वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजीत महास्वच्छता अभियान
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने चारही प्रभाग समितींच्या कार्यक्षेत्रात महास्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
सहायक आयुक्त संतोष जिरगे, रोशनी गोडे, रामचंद्र कांबळे आणि नितीन बनगे यांच्या नेतृत्वाखाली विविध भागात स्वच्छता मोहीम पार पडली. प्रभाग समिती ‘अ’ मध्ये पंचगंगा नदी घाट, प्रभाग ‘ब’ मध्ये किसान चौक व कलानगर, प्रभाग ‘क’ मध्ये जयभीम झोपडपट्टी, वडर गल्ली व फकीर मळा, तर प्रभाग ‘ड’ मध्ये शहापूर परिसरात विशेष स्वच्छता करण्यात आली.
अभियानांतर्गत कचरा संकलन, झाडाझुडपांची छाटणी, नाले-गटारी स्वच्छता, रस्त्यालगतचा गाळ हटविणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, अभिषेक वाळवेकर, नंदकुमार पाटील तसेच नगरसेवक मनोज हिंगमिरे, सयाजी चव्हाण, ओंकार सुर्वे, योगेश पाटील, सचिन राणे, नगरसेविका विजया महाजन, मनिषा कुपटे, मोनाली मांजरे, सपना भिसे यांच्यासह अधिकारी व स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले.
महास्वच्छता अभियानात सहभागी नगरसेवक अधिकारी व कर्मचारी वर्ग
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






