महापौर चषक बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका व इचलकरंजी चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे महापौर चषक बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. खुला गट व १५ वर्षाखालील गटात झालेल्या या स्पर्धेत शहर व परिसरातील ३१४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्विसलिग पद्धतीने झालेल्या स्पर्धेचा शुभारंभ उपमहापौर अनिल डाळया व स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते झाला. खुल्या गटात श्रीराज भोसले प्रथम, रविंद्र निकम द्वितीय व व्यंकटेश खाडेपाटील तृतीय ठरले. तर महिला गटात सिद्धी बुबने यांनी बाजी मारली.
१५ वर्षाखालील गटात वरद पाटील प्रथम, अभय भोसले द्वितीय व अथर्व तावरे तृतीय आले. विविध वयोगटांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण उपायुक्त नंदू परळकर व सहायक आयुक्त सुनील शिंदे यांच्या हस्ते झाले.
बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी खेळाडु
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







