ICHMH51NEWS.IN
9921600800

अॅमॅच्युअर’च्या दहा खेळाडूंना ‘ब्लॅक बेल्ट’ उच्च पदवी प्रदान ! – ९ मुलींचा समावेश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अॅमॅच्युअर’च्या दहा खेळाडूंना ‘ब्लॅक बेल्ट’ उच्च पदवी प्रदान ! – ९ मुलींचा समावेश

इचलकरंजी – ‘ब्लॅक बेल्ट २०२६’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या इचलकरंजी अॅमॅच्युअर तायक्वोंदो अॅकॅडमीच्या १० खेळाडूंना ‘ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान सोहळा’ दिमाखात पार पडला. यशस्वी खेळाडूंमध्ये नऊ मुलींचा समावेश आहे.
‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत उत्तीर्ण झालेले खेळाडू खालीलप्रमाणे परीधी योगेश पारीक, भाविका विजय जोशी, श्रेया शरद कोष्टी, प्रांजली प्रदीप पाटील, गार्गी अमोल पाटील, दिशा विजय जोशी, सिद्धा कुलदीप गाडदी, गायत्री प्रकाश लोले, श्रद्धा दिलीप चव्हाण आणि विराज तुळशीदास येसाटे.
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी संघाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष सुरेशचंद दरगड तसेच महेश सेवा समिती, इचलकरंजीचे खजिनदार श्रीकांत बंग यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. श्री. दरगड यांनी सध्या मुली-महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर अधिक संख्येने ब्लॅक बेल्ट होणाऱ्या मुलींचे कौतुक केले. तर श्री. बंग यांनी अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या बहुसंख्य मुलींचा सहभाग पाहून समाधान व्यक्त केले.
उत्तीर्ण खेळाडूंना ग्रॅण्डमास्टर रविकिरण चौगुले यांनी ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान केली. यावेळी मुख्य प्रशिक्षिका सौ. किरण चौगुले (सिनीअर ब्लॅक बेल्ट) यांच्यासह रोहित सुतार, कु. रिया चौगुले, विवेक अग्रवाल, कुलदीप राजपुरोहित आदि ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक, पालकवृंद उपस्थित होते.

ब्लॅक बेल्ट विजेते खेळाडू व प्रशिक्षक

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा