ICHMH51NEWS.IN
9921600800

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आज इचलकरंजीत सर्वपक्षीय तिरंगा रॅली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आज इचलकरंजीत सर्वपक्षीय तिरंगा रॅली

इचलकरंजी :
 दिल्लीतील विविध विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी इचलकरंजीत शनिवार, २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सर्वपक्षीय ‘तिरंगा रॅली’ आयोजित करण्यात आली आहे. आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार असून त्यांच्यावरील कारवाई निषेधार्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी ऐक्य व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात येणार आहे. रॅली श्रीशिवतीर्थ येथून सुरू होऊन श्रीशंभूतीर्थ मार्गे महात्मा गांधी पुतळा येथे समाप्त होईल. यावेळी संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येणार असून, शेवटी निषेध व्यक्त केला जाईल. या रॅलीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, शिक्षक, वकील, डॉक्टर, कामगार, युवक, महिला आणि नागरिकांनी राष्ट्रीय तिरंग्यासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा