ICHMH51NEWS.IN
9921600800

लोकमान्य टिळकांना इचलकरंजी महापालिकेकडून अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लोकमान्य टिळकांना इचलकरंजी महापालिकेकडून अभिवादन

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार (दि. २३) रोजी राजवाडा चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्थायी समिती सभापती सतीश मुळीक व अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते, समाजकल्याण सभापती रुबन आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी नगरसेवक अमरजित जाधव, अविनाश कांबळे, सहायक संचालक (नगररचना) विजय फुलपगारे, सहाय्यक आयुक्त नितीन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी, भांडार अधीक्षक सुजाता दाभोळे, स्वच्छता निरीक्षक जयदीप शिंदे, दिलीप मगदुम, मंजुनाथ खंदारे आदी उपस्थित होते.

लोकमान्य टिळकांना अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे,सतीश मुळीक व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा