आयुक्त वादावर पडदा टाकण्याचा आ.राहुल आवाडेंच्या प्रयत्न.
इचलकरंजी:
महिला नगरसेविकाना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरून इचलकरंजी महानगरपालिकेतील वातावरण तापले असून याप्रकरणी आज आ.राहुल आवाडे यांनी एका वित्तीय संस्थेत शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे,मनोज साळुंखे यांची असयुक्तांसह बैठक घेतली.या बैठकीत साळुंखे दाम्पत्यासमोर त्यांनी आयुक्तांना नगरसेविकांचा मान सन्मान राखण्याची सूचना केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले तर आयुक्तांनी माझा हेतू कुणाचा अपमान करण्याचा नव्हता असे सांगत वेळ मारून नेली.
विषय महापौर दालनातच मिटला पाहिजे.- सुनील महाजन
झालेला प्रकार हा सर्व नगरसेविकांच्या बाबतीत असून तो ६ महिन्यापासून धुमसत आहे,यामुळे महापौरांकडे आम्ही तक्रार केली असून हा प्रश्न महापौर दालनातच मिटला पाहिजे असे स्पष्ट मत माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांनी व्यक्त केले.
थंड हवेच्या ठिकाणच्या कारभाऱ्याची मध्यस्थी.
सुरवातीपासून एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कारभार बघणाऱ्या थंड हवेच्या ठिकाणच्या एका कारभाऱ्याने सातत्याने संपर्कात राहून साळुंखे दाम्पत्याची चर्चा घडवून आणली असुन याच्या मनपा कारभारातील लुडबुडीने अनेक नगरसेवक नाराज आहेत.
आमदारांनी सर्व नगरसेवकांची बैठक बोलवून समन्वय साधण्याची गरज
आ.राहुल आवाडे यांनी महायुतीच्या सर्व नगरसेवकांशी एकत्रित बैठक घेऊन समन्वय साधण्याची गरज असून वेळीच विसंवाद न रोखल्यास याचा उद्रेक वरिष्ठ पातळीवर जाण्याची शक्यता आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





