ICHMH51NEWS.IN
9921600800

महापौरांच्या आश्वासनानंतर शिवतीर्थ येथील फेरीवाल्यांचे आमरण उपोषण मागे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापौरांच्या आश्वासनानंतर शिवतीर्थ येथील फेरीवाल्यांचे आमरण उपोषण मागे

इचलकरंजी : शिवतीर्थ परिसरातील फेरीवाल्यांच्या गाळ्यांच्या प्रश्नावरून फेरीवाला संघटनेने २२ जुलैपासून सुरू केलेले आमरण उपोषण महापौर उदय धातुंडे यांच्या आश्वासनानंतर शुक्रवारी मागे घेण्यात आले. महापौरांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शिवतीर्थ परिसरातील फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. तसेच महानगरपालिका प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर महापौर उदय धातुंडे, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, परिवहन सभापती अरुणा बचाटे व मागासवर्गीय सभापती रुबेन आवळे यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, शहाजी भोसले, भाऊसो आवळे, शशिकांत मोहिते, प्रमोद बचाटे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. महापौरांच्या आश्वासनानंतर फेरीवाला संघटनेने उपोषण मागे घेतल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सरबत देऊन उपोषण सोडवताना महापौर उदय धातूंडे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा