ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूर ऑटो रिक्षा मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; अमोल जगदाळे अध्यक्षपदी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूर ऑटो रिक्षा मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; अमोल जगदाळे अध्यक्षपदी

इचलकरंजी : शहापूर ऑटो रिक्षा मित्र मंडळ, शहापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी संदीप उगळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी संतोष बाबर यांनी चालू वर्षात मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच मंडळाचा वार्षिक जमाखर्च सभासदांसमोर सादर करण्यात आला. उपस्थित सर्व सभासदांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.
त्यानंतर २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सर्व सभासदांच्या एकमताने अमोल विलास जगदाळे यांची अध्यक्षपदी, तर धनाजी रामचंद्र बाबर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. तसेच मेहबूब मुजावर, संदीप कांबळे, सलीम जमादार आणि अशोक कांबळे यांची विविध पदांवर बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रमुख उपस्थित म्हणून बोलताना राष्ट्रीय रिक्षा ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल बम्मन्नावर यांनी रिक्षा स्टॉपवरील सर्व उपक्रम संघटितपणे राबविण्याचे आवाहन केले. आरटीओ कार्यालय व पोलीस ठाणे परिसरात असल्याने सर्व सभासदांनी एकजुटीने राहून कोणत्याही सदस्याला वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेच्या नियमावलीचे पालन करण्याबरोबरच प्रत्येक सभासदाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच संघटनेची खरी ताकद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी रघुनाथ कांबळे, हनुमंत नागणे, संजय वडगावे, मनोहर उगळे, राजाराम माळगे, संतोष काने, कुंदन कांबळे, अमर तोरणे, सचिन मस्के, शामराव काटाळे, राजू बेनाडे, राजू बम्मन्नावर, शरद जगदाळे यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक-मालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अनिल माने यांनी केले.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा