डी के ए.एस.सी. कॉलेजच्या प्रा. अर्चना नंदगावे यांना इंग्रजी विषयात पीएचडी पदवी जाहीर
इचलकरंजी :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथील इंग्रजी विभागाच्या प्रा. अर्चना भूपाल नंदगावे यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून इंग्रजी विषयातील डॉक्टरेट (पीएचडी) पदवी जाहीर झाली. त्यांनी “सिलेक्टेड ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी अमेरिकन मेमॉयर्स : अ स्टडी इन जॉनर” या विषयावर वर्षे सखोल संशोधन केले. हे संशोधन डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले असून, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागात त्यांची पीएचडी मौखिक परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. या यशाबद्दल त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. खाडे महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करून अभिनंदन केले.
या संशोधनासाठी डॉ. नंदगावे यांना प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभावती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक यांनी त्यांच्या अभिनंदन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





