ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या ५४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत आकर्षक पॅकेजवर निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या ५४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत आकर्षक पॅकेजवर निवड

इचलकरंजी, ता. ८ : येथील डीकेटीई टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभीच कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जुलै २०२६ या एकाच महिन्यात अभियांत्रिकी विभागातील तब्बल ५४ विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक वार्षिक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना झेन्सार टेक्नॉलॉजीमध्ये १० लाख, कॉजीटेटमध्ये ८ लाख, एक्सपरेट, क्लिंगेलनबर्ग व अॅटलास कॅपकोमध्ये ६ लाख, स्नायडरमध्ये ५.५० लाख, टाटा ऑटोकॉम्पमध्ये ५ लाख, ब्लूस्टारमध्ये ४ ते ७ लाख, नोव्हास नेक्सासमध्ये ४.२० लाख, आयबेसीसमध्ये ४ लाख आणि पियाजिओ व्हेईकल्समध्ये ४ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळाले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी संबंधित कंपन्यांमध्ये नोकरी व इंटर्नशिपलाही प्रारंभ केला आहे.

अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण आणि प्रभावी प्लेसमेंट व्यवस्थेमुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांवर उद्योगविश्वाचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे या यशातून दिसून आले आहे.

संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांनी विद्यार्थ्यांचे यश त्यांच्या परिश्रमाचे व संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे फलित असल्याचे सांगितले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा