ICHMH51NEWS.IN
9921600800

अल्पवयीन मुलाकडून टेम्पो चालवून घेतल्याप्रकरणी वाहनमालकावर गुन्हा; टेम्पो जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अल्पवयीन मुलाकडून टेम्पो चालवून घेतल्याप्रकरणी वाहनमालकावर गुन्हा; टेम्पो जप्त

इचलकरंजी, ता. ७ :
इचलकरंजी शहर वाहतूक शाखेने अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवून घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देत पालक आणि वाहनमालकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी यड्राव फाटा येथे अवघ्या १३ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलाकडून टेम्पो चालवित असल्याचे वाहतूक पोलिसांना आढळून आले.
या प्रकरणात वाहन जप्त करण्याची कारवाई सुरू असताना वाहनमालक रामबहादूर गेंडालाल निषाद (रा. उत्तर प्रदेश) याने पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद असून संबंधित टेम्पो जप्त करण्यात आला आहे. तसेच वाहनाची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात आरोपी स्क्रॅप व्यवसाय करत असून स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलाकडून वाहन चालवून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढत असून केवळ अल्पवयीन मुलाचाच नव्हे, तर इतर निष्पाप नागरिकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो, असे वाहतूक शाखेने स्पष्ट केले.
इचलकरंजी शहर वाहतूक शाखेने सर्व पालक व वाहनमालकांना अल्पवयीन मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असून सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
“अल्पवयीनांच्या हातात वाहन नव्हे, तर शिक्षण आणि सुरक्षित भविष्य द्या.” असेही आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा