ICHMH51NEWS.IN
9921600800

उपन्याससम्राट प्रेमचंद यांच्या साहित्याचा आजही समाजाला दिशादर्शक संदेश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उपन्याससम्राट प्रेमचंद यांच्या साहित्याचा आजही समाजाला दिशादर्शक संदेश

इचलकरंजी :
दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी येथील हिंदी विभागाच्या वतीने उपन्याससम्राट मुंशी प्रेमचंद जयंतीनिमित्त “उपन्याससम्राट प्रेमचंद आणि त्यांचे साहित्य” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. यशवंत गायकवाड यांनी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्या, कथा आणि साहित्यामधून सामाजिक विषमता, शोषितांचे जीवन, ग्रामीण वास्तव, मानवी मूल्ये आणि राष्ट्रीय जाणीव यांचे प्रभावी चित्रण कसे झाले आहे, याचे सविस्तर विवेचन केले. प्रेमचंद यांचे साहित्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आणि मानवतावादी विचारांची जपणूक करणारे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याचा अभ्यास करून सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि मानवी मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय हिंदी विभागप्रमुख प्रा.निलेश जाधव यांनी करून दिला. यावेळी मराठी विभागप्रमुख व सकाळ सत्रप्रमुख प्रो. (डॉ.) सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजली उबाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.अपर्णा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा.यशवंत गायकवाड यांचा सन्मान करताना प्राचार्य एस.के.खाडे सर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा