ICHMH51NEWS.IN
9921600800

नाट्यगृह नूतनीकरणामुळे यंदाचा इचलकरंजी फेस्टिव्हल स्थगित

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नाट्यगृह नूतनीकरणामुळे यंदाचा इचलकरंजी फेस्टिव्हल स्थगित

इचलकरंजी, ता. १९ : नव्या रंगात आणि नव्या ढंगातील विविध स्पर्धा तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असलेला आणि स्थानिक कलाकारांना कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा इचलकरंजी फेस्टिव्हल २०२६ यंदा नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे स्थगित ठेवण्यात आला आहे, अशी माहिती इचलकरंजी फेस्टिव्हलच्या संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांनी दिली.
गणेशोत्सव आणि इचलकरंजी फेस्टिव्हल हे गेल्या ३० वर्षांपासून एक समीकरण बनले आहे. पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी फेस्टिव्हलची सुरुवात केली. या माध्यमातून स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. शहर व परिसरातील अनेक कलाकारांनी या फेस्टिव्हलमधून आपल्या कलेला वाव देत यशाची उंच भरारी घेत इचलकरंजीच्या नावलौकिकात भर घातली आहे.
आता आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे इचलकरंजी फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने इचलकरंजी फेस्टिव्हल २०२६ स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, अनंत चतुर्दशीदिनी २५ सप्टेंबर रोजी झेंडा चौक येथे इचलकरंजी फेस्टिव्हलच्या वतीने सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांना मानाची पान-सुपारी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असेही सौ. आवाडे यांनी सांगितले.
यावेळी शेखर शहा, अहमद मुजावर आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा