ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीवर शेवटच्याक्षणी निधीचा पाऊस विकास कामांसाठी तब्बल १०.४९ कोटींचा निधी-जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांचे निकराचे प्रयत्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीवर शेवटच्याक्षणी निधीचा पाऊस विकास कामांसाठी तब्बल १०.४९ कोटींचा निधी-जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांचे निकराचे प्रयत्न
इचलकरंजी:
राज्य सरकारने इचलकरंजी शहरावर जाता जाता अक्षरश: निधीचा पाउस पाडला असून विविध विकास कामांसाठी तब्बल १० कोटी ४९ लाखांचा निधी मिळाला आहे. यासाठी जिल्हा शिवसेनाप्रमुख रविंद्र माने यांनी आचारसंहिता लागण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शासन निर्णय काढण्यासाठी निकराचे प्रयत्न केेले.
या निधी मधून नियोजीत छत्रपती संभाजी महाराज पुतळा के. एल. मलाबादे चौक, बसवेश्‍वर महाराज स्मारक परिसर. विठ्ठल मंदिर थोरात चौक, बागडी समाजाजवळ दुकान गाळे,मरगुबाई मंदिर परिसर, शहापूर येथील मारुती मंदिर संरक्षक भिंत, ज्ञानेश्‍वर मंदिर परिसर येथील विकासासाठी २.५० कोटी तर श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यासाठी ७.९९ कोटींचा निधी मिळाला आहे.
विकास कामांसाठी मंजूर झालेल्या परिसरातील नागरिकांनी जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांच्याकडे निधी मिळावा अशी मागणी केली होती. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी भरीव निधी देण्याचे आश्‍वासन माने यांनी दिले होते.  काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रयत्नाने बसवेश्‍वर स्मारकास मंजुरी मिळाली होती. मान्यवरांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभही झाला होता. यावेळी माने यांनी पहिल्या टप्प्यात १ कोटी निधी मंजूर करण्याची घोषणा केली होती. त्याची आज परिपूर्ती करुन त्यांनी शब्द पाळला अशी भावना लिंगायत समाजाने व्यक्त केली आहे. तर काही वर्षांपासून संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्‍न प्रलंबित होता. तोही प्रश्‍न तत्परतेने माने यांनी पुतळ्याला मंजुरी मिळवून १ कोटी निधीही मिळवून दिल्याने शहरातून समाधान व्यक्त होत आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातून रविंद्र माने यांना धन्यवाद
नाट्यगृह मोडकळीस आले आहे. त्यामुळे येथे कार्यक्रम घेण्यावर मर्यादा येत होत्या. यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम तर जवळपास बंद झाले होते. या नाट्यगृहाचे नुतनीकरण व्हावे अशी मागणी पुढे आली होती. यासाठी रविंद्र माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत तब्बल ७.९९ कोटींचा निधी मिळवून दिला. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातून रविंद्र माने यांना धन्यवाद दिले जात आहेत.
वचनपूर्ती केल्याचे समाधान
इचलकरंजी शहरासाठी दोन वर्षात १०० कोटींहून अधिक निधी खेचून आणला आहे. नाट्यगृहास संभाजी महाराज पुतळा, बसवेश्‍वर स्मारक आदी कामांसाठी निधी देण्याचे वचन दिले होते.त्याची परिपूर्ती केल्याचे समाधान वाटते.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,खासदार धैर्यशीलदादा माने यांचे सहकार्य लाभले
रविंद्र माने
जिल्हा शिवसेना प्रमुख
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा