ICHMH51NEWS.IN
9921600800

भाजपने निष्ठावंतांचे हाल केले,हाळवणकराणा पण इकडे आणा-आ.सतेज पाटील.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपने निष्ठावंतांचे हाल केले,हाळवणकराणा पण इकडे आणा-आ.सतेज पाटील.
इचलकरंजी :  राज्यात भाजपा हा कर्तुत्वावर आणि ताकदीवर सत्तेत येऊ शकत नाही म्हणून त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडला. परंतु, भाजपकडे १०५ आमदार असतानाही त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. यातूनच भाजपची निष्क्रियता आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरील अविश्वास दिसून आल्याची टीका माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली. तसेच राज्यात शंभर टक्के महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे सांगत शहरातील महत्त्वाचा पाणी प्रश्न, वस्त्रोद्योगातील प्रलंबित प्रश्न सोडवून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.
             मराठा मंडळ सांस्कृतीक भवन येथे महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या परिवर्तन नियोजन मेळाव्यामध्ये ते बोलत होते.ते पुढे म्हणाले माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी जोरदार बॅटिंग केल्याचा उल्लेख करत हाळवणकर, हिंदुराव शेळके व अरुण इंगवले हे जुने मित्र असल्याचे संपूर्ण जिल्ह्याला माहिती असून हे तिघेही एकाच दिशेने जातात. गाडी कोण पुढे न्यायची इतकाच प्रश्न असतो. मात्र, तिघांची लाईन एकच असते. असे म्हणत हिंदुराव शेळके आले आहेत असे सांगत शेवटच्या चार दिवसात आपण हाळवणकर यांनाही घेऊन या असा मिश्किल टोलाही पाटील यांनी लगावला.  इचलकरंजी शहर हे हिशोब ठेवणारे शहर असून ज्यांनी पाणी व वीज दर संदर्भात फसवलं त्यांचा हिशेब चुकता करा असे आवाहन पाटील यांनी केले.
                महाविकास आघाडीने राज्याचा कारभार चांगला केला. त्यानुसार महाराष्ट्रात भाजप सरकार पुन्हा येणार नाही हे लक्षात येताच त्यांनी पक्ष फोडाफोडीचे कारस्थान केले. लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळाले. त्यामुळे विधानसभेलाही महाविकास आघाडीसाठी परिवर्तनाची नांदी ठरेल.वारणा योजनेला खो घालणाऱ्या खासदारांना किंमत मोजावी लागली.आमदारांनाही किंमत मोजावी लागेल म्हणूनच त्यांनी मुलाला उभे केले असल्याची टीका आमदार प्रकाश आवडते यांचे नाव न घेता मदन कारंडे यांनी केली. यावेळी काँग्रेसचे शशांक बावचकर, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष वैभव उगळे,प्रताप होगाडे,अजित मामा जाधव, माजी नगराध्यक्षा मेघा चाळके, संजय कांबळे, राहुल खंजीरे,रणजित जाधव आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
 सर्वसामान्यांची दिवाळी राज्य सरकारने कडू केली 
लोकसभेत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय दिला. लोकसभेला बहिणींनी नाकारल्या नंतर सरकारच्या लक्षात आले आणि त्यांना बहीण आठवली. परंतु, सोने, खाद्यतेल,गुळ आदींसह वाढलेल्या दरवाढी मुळे सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी कडू केली असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
आवाडेना हद्दपार करा-हिंदुराव शेळके.
सण १९७८ पासून बॅलेट पेपर वर आवाडे यांचे नाव दिसते. सुमारे चाळीस वर्षात आवाडे कुटुंबीयांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राजकारण केले. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी वारणा योजनेलाही खो घातला. त्यामुळे आवाडे हे इचलकरंजीला लागलेला कॅन्सर, असल्याची टीका हिंदुराव शेळके यांनी केली. शहराला सुख, समाधान वस्त्रोद्योग वाढायचा असेल तर परिवर्तन आवश्यक असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा