ICHMH51NEWS.IN
9921600800

व्यापाऱ्यांसाठी नविन उपक्रम राबवणार-मदन कारंडे यांचे व्यापारी मेळाव्यात मनोगत.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

व्यापाऱ्यांसाठी नविन उपक्रम राबवणार-मदन कारंडे यांचे व्यापारी मेळाव्यात मनोगत.
इचलकरंजी :
महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी येथील राधाकृष्ण कॉलनी येथे व्यापाऱ्यांशी संवाद साधत व्यापाऱ्यांच्या समस्या, आव्हाने व त्यांच्या क्षेत्रातील गरजा जाणून घेतल्या. तसेच व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवे उपक्रम राबवणार, असे आश्वासन मदन कारंडे यांनी दिले.
               महाविकास आघाडीचे उमेदवार मधून कारंडे यांनी इचलकरंजीतील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, इचलकरंजीच्या विकासासाठी ठोस योजना सकरण्याचा संकल्प व्यक्त केला. दरम्यान, परिवर्तनासाठी एकत्र येऊ, इचलकरंजीच्या प्रगतीसाठी नवा आध्यय लिहू, असा आशावादी संदेश देत त्यांनी या परिवर्तनाच्या प्रवासात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके, माजी उपनगराध्यक्ष रणजीत जाधव, जागृती यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांच्यासह इचलकरंजीतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा