सत्तापदे भोगून पाठीत खंजिर खुपसणाऱ्या घराणेशाहीला संपवण्याची हीच वेळ-शशांक बावचकर
इचलकरंजी :
काँग्रेस पक्षाने ज्यांना भरभरून दिले. त्यांनी काँग्रेस पक्षाशी गद्दारी करत भाजपची हात मिळवणी केली. पक्षाने खासदार, मंत्री पद दिले. त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसत आपल्या फायद्यासाठी मत मागत आहेत. अशा घराणेशाहीला संपवण्याची वेळ असून मतदारांनी मार्गदर्शक उमेदवार मदन कारंडे यांना प्रचंड मताने निवडून द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केले.
कोरोची तालुका हातकलंगले येथील महालक्ष्मी वसाहत परिसरामध्ये घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेमध्ये ते बोलत होते. बावचकर पुढे म्हणाले , काँग्रेसने गेल्या साठ वर्षात विकास कामाच्या जोरावरती महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन गेले. याच विकासाच्या जोरावरती ज्यांना काँग्रेसने भरभरून दिले. त्यांनी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव न घेता बावचकर यांनी केली. यावेळी कॉम्रेड सदा मलाबादे , मा.जि.प.सदस्य देवानंद कांबळे, दीपक पाटील ,सतीश लोहार, सदाशिव आत्मापुरे, दारासिंग सागरे, पोपट शिंदे ,चंद्रकांत आवळे, इम्तियाज शेख, अशोक तोडकर, ग्रा.पं. सदस्य स्नेहल कोरोचीकर, हलीमा सनदी, साहेबलाल शेख, अमोल कोरोचीकर यांच्या महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







