ICHMH51NEWS.IN
9921600800

मदन कारंडेना आमदार करून कै. नितीन जांभळेंचे स्वप्न पुर्ण करूया-सुहास जांभळे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मदन कारंडेना आमदार करून कै. नितीन जांभळेंचे स्वप्न पुर्ण करूया-सुहास जांभळे

इचलकरंजी : येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचाच आमदार होणार असे पाहिलेले स्वप्न कै.नितीन जांभळे यांचे पूर्ण करूया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना मोठ्या लीडणे विजयी करूया, असे आवाहन युवा शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी केले.
          शहापूर भागातील भाटले मळा, कृष्णानगर व दत्तनगर भागात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घटा मार्फत कॉर्नर सभा घेण्यात आली. त्यावेळी सुहास जांभळे बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले , ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून आपला एकच निर्धार. मदन कारंडे हे आमदार होणार आणि कैलासवासी येथील जांभळे यांचे स्वप्न पूर्ण होणार, असे आश्वासन दिले.
            कॉर्नर सभेत महाराष्ट्र प्रदेश सचिव शशांक बावचकर, माजी नगरसेवक अजित मामा जाधव, माजी उपनगराध्यक्ष रंजीत जाधव, मलकारी लवटे ,गणेश सावरतकर,  जयदीप जांभळे, अमोल भाटले, सयाजी चव्हाण, दशरथ माने, सावकार गोसावी संतोष गौड आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या कॉर्नर सभेवेळी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा