ICHMH51NEWS.IN
9921600800

विकासनगर,गणेशनगर भागात मदन कारंडेंच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विकासनगर,गणेशनगर भागात मदन कारंडेंच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद.

इचलकरंजी : येथील विकासनगर व गणेशनगर भागामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा पार पडली. माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये म्हसोबा मंदिर येथे श्रीफळ वाढवून सुरुवात झाली. यावेळी स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
             परिसरामध्ये कारंडे यांनी जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध, असल्याचे आश्वासन दिले. पदयात्रेदरम्यान, मदन कारंडे यांनी महाविकास आघाडीच्या विकास कार्यक्रमांचे महत्त्व विशद केले. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही त्यांनी भर दिला. विशेषत : इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठा समस्या आणि रस्ते विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे,आश्वासन ही त्यांनी शेवटी नमूद केले.
              दरम्यान, विविध ठिकाणी कारंडे यांना शाल व बुके देऊन पाठिंबा दर्शवला. विकासनगर व गणेशनगर परीसरातील जनतेत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या बदलांच्या अपेक्षेने नागरिकांमध्ये एकजूट आणि उत्साह दिसून आला. पदयात्रेत युवा शहर जिल्हाअध्यक्ष सुहास जांभळे ,सयाजी चव्हाण, शिवाजी शिंदे,अमोल भाटले, गुड्डू शेख, रमेश कांबळे, दशरथ माने, मिथुन नांदुरकर,सुभाष डावरे, विजय देवकर, लक्ष्मण पाटील, बापूसू जाधव, वसंत कसलकर, अनिल जुवे, अमित पडियार, गोडसे मामा, प्रवीण खाडे,, दादा पाटील, आदींसह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा