ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत मतदान शांततेत,१३ जणांचे भवितव्य इव्हीएम मधे बंद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

इचलकरंजीत मतदान शांततेत,१३ जणांचे भवितव्य इव्हीएम मधे बंद
इचलकरंजी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
इचलकरंजी मध्ये एकूण ३ लाख १२ हजार मतदारांपैकी २,१५,६२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६८.९५% इतकी झाली.
यामध्ये १,१०,४४९ पुरुष १,०५,१६० महिला तर ११ इतर मतदारांचा समावेश आहे.
महायुतीचे राहुल आवाडे व महाविकास आघाडीचे मदन कारंडे यांच्यात प्रमुख लढत झाली.ग्रामीण भागासह इचलकरंजी शहरातील २६७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.महापालिका प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेसाठी जोरदार तयारी केली होती.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीप अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन – अण्णा रामगोंडा शाळा.पिंक पोलिंग स्टेशन – बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज.वस्त्रनगरी – सरस्वती हायस्कूल.टाकाऊ पासून टिकाऊ – आदर्श विद्यामंदिर.महिला सबलीकरण -द न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज.मॉडेल पोलिंग स्टेशन -गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज.वस्त्र नगरीच्या पाऊलखुणा- गंगामाई विद्या मंदिर, इचलकरंजी.चांद्रयान व्यंकटराव हायस्कूल व जूनियर कॉलेज.प्लास्टिकचा वापर टाळा – माई बाल विद्यामंदिर.इचलकरंजीचा सांस्कृतिक इतिहास -गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज.दिव्यांग पोलिंग स्टेशन- तात्यासाहेब मुसळे विद्यालय. पर्यावरण संवर्धन – मथुरा हायस्कूल.पर्यावरण संवर्धन – शहापूर हायस्कूल.अशी थीम बेस मतदान केंद्र उभारण्यात आली होती.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा