महाजन गुरुजी करतात राजाराम मैदानाची स्वच्छता, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.
इचलकरंजी
इचलकरंजी येथील राजाराम मैदानाची स्वच्छता महाजन गुरुजी करताना आज सकाळी काही खेळाडूंनी बघितले.त्यावेळी महापालिका प्रशासन नेमके करते तरी काय असा प्रश्न उपस्थित करून खेळाडूनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
व्हिडीओ लिंक
https://youtu.be/OxXKeoxRM8I?si=YL_uwS69meXXXR-T
इचलकरंजी शहरात कोट्यवधीचा स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे,तरीसुद्धा कित्येक भागात नागरिक स्वतः स्वच्छता करताना आढळतात. यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित नागरिकांचे महापलिकेच्या अनियमिततेला कंटाळून स्वतः स्वच्छता करतानाचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.आज सकाळी इचलकरंजी महापालिकेने स्वच्छतादूत नियुक्ती केलेले गजानन महाजन गुरुजी राजाराम मैदानात स्वच्छता करताना दिसले यामुळे शहराच्या स्वच्छतेवर नियंत्रण कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला असून आरोग्य विभागाच्या कारभारावर नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








