ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी यंत्रणा सज्ज

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी यंत्रणा सज्ज

इचलकरंजी
         सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक मा.विश्व मोहन शर्मा यांच्या देखरेखीखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या नियंत्रणाखाली तसेच सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर, डॉ.सदाशिव जाधव आणि सुनिल शेरखाने यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता शहरातील राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे होणार असून मतमोजणी साठी आवश्यक असलेली प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज करणेत आलेली आहे.
         इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एकुण २,१७,८५३ (६९.६८%) इतके मतदान झाले आहे. मतमोजणी साठी जवळपास ४०० अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. इ.व्ही.एम.वरील मतमोजणी साठी एकुण १४ टेबल लावणेत येणार असून २० फेऱ्या होणार आहेत. याकरीता १ मतमोजणी सुपरवायजर, १ सुक्ष्म निरीक्षक आणि १ सहायक असणार आहे.
     टपाली मतदानाच्या मतमोजणी साठी एकुण १० टेबल लावणेत येणार असून याकरिता १ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, १ सुपरवायजर आणि १ सुक्ष्म निरीक्षक आणि ३ सहायक  असणार आहे.
    त्याचबरोबर सैन्य दलातील मतदारांच्या मतमोजणी साठी एकुण २ टेबल लावणेत येणार असून याकरिता १ सहा‌. निवडणूक निर्णय अधिकारी, २ सुपरवायजर आणि १ सहायक असणार आहे.
   प्रत्येक टेबल समोर उमेदवारांचे प्रत्येकी एक मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित राहु शकतात.
        मतमोजणीच्या ठिकाणी कॉम्प्युटर इंटरनेट या सुविधेसह सुसज्ज मीडिया कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्हा माहिती कार्यालय यांचेकडून  ओळखपत्र प्राप्त असलेल्या प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे.
   मतमोजणी साठी एकुण तीन स्तरावर सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करणेत आलेली असून स्ट्रॉंग रूमची सुरक्षा केंद्रीय पोलीस दलाच्या नियंत्रणात असुन १०० मीटरवर स्थानिक पोलीसांची सुरक्षा आहे तसेच  मुख्य प्रवेशद्वारा नजीक राज्य राखीव दलाची यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे.
  मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये मतमोजणीसाठी का नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांचे व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश मिळणार नाही.
मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल,इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टवॉच, लॅपटॉप इत्यादी घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेले आहे.
                 प्रत्येक फेरीनिहाय मतमोजणीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतील याकरिता राजीव गांधी भवन इमारतीच्या चारी बाजूला लाऊड स्पीकरची सोय करण्यात आलेली आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा