प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजीनगर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, ११ जण जुगारप्रकरणी ताब्यात.
इचलकरंजी:
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकून ११ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास जुना चंदुर रोड येथे करण्यात आली.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी बेकायदा तीन पानाच्या जुगाराचा खेळ सुरू असताना केलेल्या कारवाईत पोलिसांनी एकूण २,५४,८६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रोख रक्कम ₹५४,८६०/-, मोबाईल फोन, पत्याचे पान आणि चार मोटारसायकलींचा समावेश आहे.याप्रकरणी सिद्राम हुल्ले (६१),राजाराम वसवाडे (५५),पोपट देवकाते (७६),बमलिंग हिप्परगी (५२),संजय जाधव (४५),श्रीधर तेरणे (३९),गुरुनाथ अंकद (५३),तानाजी भोसले (३९), शौकत मंगसुळे (५०),राजेंद्र घोटणे (५०),सतगोंडा पाटील (७२) यांना ताब्यात घेण्यात आले असून पो.कॉ.सुकुमार बरगाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कसेकर यांनी कारवाई केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







