ICHMH51NEWS.IN
9921600800

दारूच्या नशेत हॉटेलमध्ये हाणामारी,दोघांवर गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दारूच्या नशेत हॉटेलमध्ये हाणामारी,दोघांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी:

शहरातील हॉटेल परिंदा परमिट रूम बिअर बार येथे दारूच्या नशेत दोन तरुणांनी गोंधळ घालत बार मालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संपत शंभु शेट्टी (वय ३३, व्यवसाय- बार मालक, रा. कबनूर, कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रथमेश संजय ठोंबरे (वय २१, रा. इचलकरंजी) आणि संगमेश्वर सिद्धाण्णा बिराजदार (वय २२ रा. इचलकरंजी) हे हॉटेलमध्ये दारू पित असताना मोठमोठ्याने भांडू लागले. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून फिर्यादी आणि त्यांचे मॅनेजर भांडण सोडवण्यासाठी गेले असता, प्रथमेश ठोंबरे याने काचेचा ग्लास फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करून बारमध्ये दहशत माजवली.

शेट्टी यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.हे.काँ चव्हाण तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, तर प्रभारी अधिकारी पो.नि. सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा