ICHMH51NEWS.IN
9921600800

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग कॉलेजला मंजुरी-आ.राहुल आवाडेंच्या प्रयत्नास यश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग कॉलेजला मंजुरी-आ.राहुल आवाडेंच्या प्रयत्नास यश

इचलकरंजी –
सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण होत असलेल्या आणि सर्वसामान्यांचा आधारवड बनलेल्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास मंजूर परिचर्या प्रशिक्षण (नर्सिंग कॉलेज) महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून जी.एन.एम. अभ्यासक‘म सुरु करण्यास शासनाच्या वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मान्यता दिली आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून अभ्यासक‘म महाविद्यालयास मान्यता मिळाल्यानंतर आता अभ्यासक्रमासाठीही मान्यता मिळाल्याने रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा, मनुष्यबळ प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेले कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या इचलकरंजी शहर व परिसरातील कोणीही रुग्ण उपचाराविना परत जावू नये यासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यातच याठिकाणी नर्सिंग कॉलेज सुरु झाल्यास आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होण्यासह याठिकाणी आलेला रुग्ण उपचाराशिवाय परत जाणार नाही यासाठी आमदार राहुल आवाडे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रयत्नशील होते.
या संदर्भात फेब‘ुवारी २०२५ मध्ये शासकीय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नर्सिंग कॉलेज (परिचर्या प्रशिक्षण केंद्र) सुरु करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिलेली होती. त्यानंतर वैद्यकिय शिक्षण मुंबई आयुक्त यांनी रुग्णालयाची सक्षमता तपासणी समितीद्वारे पाहणी करुन अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयास सन २०२५-२६ या सालापासून ४० विद्यार्थी क्षमतेसह नवीन जी.एन.एम. अभ्यासक‘म सुरु करण्यास मान्यता दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश १७ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.
इचलकरंजी शहर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यासह नजीकच्या सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय मोठा आधार बनले आहे. इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग व अन्य उद्योगांमुळे कामगार व झोपडपट्टीवासियांची सं‘या मोठी आहे. त्यांना आरोग्याशी संबंधित सर्व अत्यावश्यक उपचार तातडीने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आता नर्सिंग कॉलेज सुरु झाल्यानंतर सर्वच अत्याधुनिक सेवा-सुविधा, औषधोपचार मिळणार आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा