ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपाचा कामगार दिनानिमित्त अधिकारी कर्मचारी यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपाचा कामगार दिनानिमित्त अधिकारी कर्मचारी यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

   इचलकरंजी
           १ मे २०२५ रोजी  कामगार दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत येते.यामध्ये  प्रामुख्याने महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
        या अनुषंगाने आज गुरुवार १  मे रोजी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे करणेत आले होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ
आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील,अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि उपायुक्त नंदु परळकर  यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करणेत आले.
  तदनंतर कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणेत आले.
         विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांची कन्या कु.प्राग्या पाटील हिने उस्फुर्तपणे नृत्यअविष्कार सादर केला.
त्याचबरोबर मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी सहभाग घेवून सर्व अधिकारी कर्मचारी यांचा उत्साह वाढविला.
कामगार दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका कर्मचारी भारत कोपार्डे यांची कन्या भाग्यश्री कोपार्डे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रतिमेची अप्रतिम रांगोळी कलाकृती साकारली होती. यानिमित्ताने आयुक्त यांच्या हस्ते भाग्यश्री कोपार्डे यांचा सत्कार करण्यात आला.
    तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे यांनी फिरत्या पोस्टरवर आयुक्त यांची प्रतिमा हस्तकलेने साकारली.
          आजच्या कार्यक्रमात धनंजय पळसुले, उमेश कांबळे, सूर्यकांत शेटे, रामचंद्र कांबळे, शाखेनंद कांबळे, शीतल पाटील, अविनाश मोरे ,पियुष लालबेग  नवनाथ जाधव, शिवाजी जोगळेकर, महाराष्ट्र सुरक्षा दल जवान, सदाशिव शिंदे, शाख्यानंद कांबळे, वरुण चुनारी, राजश्री कोरगांवकर ,सिंधुताई कांबळे, युवराज भोसले, शुभांगी जोशी, कृष्णा आवळे, हरीश कांबळे, अनिस पठाण, निखिल आसोळे, जयपाल कांबळे , किशोर खोत संदेश बंडगे, संदीप कांबळे , नितीन गुलफागे ,शोभा लोकरे योगेश गायकवाड ,आकाश आवळे, विनोद कांबळे, ऋतुजा कांबळे, आकाश पाटील, भारती राजपूत आदी अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
   यावेळी सहा.आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत,प्रा.ए.बी. पाटील, शिवाजी जगताप, के.के. कांबळे, शंकर अगसर,  आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहरातील प्रसिद्ध गायक,सुत्र संचालक मनिष आपटे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा