ICHMH51NEWS.IN
9921600800

कोल्हापुर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची इचलकरंजीत गांजा कारवाई,३ किलो २२० ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण १,५१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापुर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची इचलकरंजीत गांजा कारवाई,३ किलो २२० ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण १,५१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी
मा.पोलीस अधीक्षक, श्री महेंद्र पंडित सोो, यांनी अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ, साठा तसेच विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन गुन्हेगाराबाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सागर चौगले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिनांक ०९/०५/२०२५ रोजी इचलकरंजी ते चंदूर जाणारे रोडवर अलायन्स हॉस्पीटलचे पाठीमागे जामदार मळा येथे एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावून सापळा लावून छापा टाकला असता गांजा विक्री करणेसाठी आलेला एक इसम मिळून आला. त्यास ताबेत घेवून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गुरुदेव पांडुरंग सकट वय ४२ वर्षे, रा. रेल्वे स्टेशनजवळ, पाटील मळा, हातकणंगले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर सध्या रा. शिरोळ, ता. शिरोळ असे असलेचे सांगितले. त्याचे ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. सदर बाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करुन त्याचे कब्ज्यातून बेकादेशीर विक्रीकरीता आणलेला एकूण ३ किलो २२० ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण १,५१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. सदर आरोपी विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणेस एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गांजा त्याने कोणाकडून विकत घेतला व कोणास विकत आहे याचा तपास चालू आहे. यातील आरोपी गुरुदेव सकट याचेवर यापूर्वी जुगार व एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो,अपर पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सागर चौगले, प्रशांत कांबळे, अशोक पोवार, महेश आंबी, संजय कुंभार, महेश पाटील, वैभव जाधव, महेश खोत, विशाल चौगले, प्रदिप पाटील, सागर माने, नामदेव यादव, अनिल जाधव, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील यांचे पथकाने केली
आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा