ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत घरफोडी; २.३३ लाखांचा ऐवज चोरीस

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत घरफोडी; २.३३ लाखांचा ऐवज चोरीस

इचलकरंजी

शहरातील आमराई रोडवरील चौगुले मळा येथील अरिंहत निवासमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे २.३३.८०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुदर्शन चंद्रकांत पाटील (वय ५८, व्यवसाय किराणा दुकानदार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,७ मे २०२५ रोजी रात्री १०.३० ते ११ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० दरम्यान त्यांच्या घरातील खालच्या मजल्यावरील बेडरूममधून चोरट्यांनी लोखंडी तिजोरीचे व लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून २२.८ ग्रॅम सोन्याचे दागिने, १०७० ग्रॅम चांदीची भांडी व रोख १० हजार रुपये असा एकूण २.३३.८०० रुपयांचा माल चोरून नेला.

या प्रकरणी पो.हे.कॉ. 1223 बंडगर यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी भेट दिली आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा