ICHMH51NEWS.IN
9921600800

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; ६ जणाविरोधात गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; ६ जणाविरोधात गुन्हा.

शहापूर:
शहापूर परिसरात जुन्या वादातून तरुणावर दगडाने डोक्यात मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जैद उर्फ जाहिद लियाकत काझी (वय २०, व्यवसाय – सेंट्रीग काम, रा. महालक्ष्मीनगर, गल्ली नं.3, शहापूर) यांच्या फिर्यादीवरून सहा आरोपींविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार रविवारी रात्री फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडला.आरोपी गिड्या वडर, सोन्या वडर, कया वडर (पूर्ण नावे अद्याप अस्पष्ट), सर्व रा. जयभीमनगर, शहापूर व त्यांच्यासोबत आणखी तीन अनोळखी तरुणांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ करत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी आरोपी सोन्या वडर याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारले. यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या मारहाणीपूर्वी दिनांक १० मे रोजी फिर्यादीचा मित्र नदीम चौधरी आणि आरोपी कया वडर यांच्यात रस्त्यावर थांबण्यावरून वाद झाला होता. तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी सोन्या वडर याने फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली होती. त्याचाच राग मनात धरून दुसऱ्या दिवशी हा हल्ला झाला, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ मोहिते करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा