ICHMH51NEWS.IN
9921600800

निमशिरगाव पाणीपुरवठा योजना जवाहर कारखाना आधुनिकीकरणातून चालवेल-माजी मंत्री प्रकाश आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

निमशिरगाव पाणीपुरवठा योजना जवाहर कारखाना आधुनिकीकरणातून चालवेल-माजी मंत्री प्रकाश आवाडे

इचलकरंजी –
बदलत्या काळानुरुप नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्याच अनुषंगाने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगांव परिसर सहकारी कृषी पाणी पुरवठा याेजना एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशस्वीपणे चालवेल. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल हाेईल. त्याचबराेबर स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी पाहिलेले स्वप्न सर्वांनी मिळून साकार करुया, असे प्रतिपादन माजी वस्त्राद्याेग मंत्री प्रकाश आवाडे यांनी निमशिरगांव येथे बाेलताना केले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगांव परिसर सहकारी कृषी पाणी पुरवठा याेजना या संस्थेचे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे हस्तांतरण करणेसंदर्भात चर्चा करण्यासाठी निमशिरगांव येथे संस्थेच्या विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्याप्रसंगी माजी मंत्री आवाडे बाेलत हाेते.
ते म्हणाले, सर्वच क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत असून शेतीमध्येही या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. त्याच अनुषंगाने एआय तंत्रज्ञान आले आहे. सध्याची शेतीची परिस्थिती पाहता एआय तंत्रज्ञान आणि ठिबक सिंचन याचा वापर हाेणे गरजेचे बनले आहे. जवाहर कारखान्याची काेणतीही स्वत:ची पाणी पुरवठा याेजना नाही. मात्र कारखान्याच्या पुढाकारातून तळंदगे आणि हुपरी येथील शेतकèयांसाठी पाणी पुरवठा याेजना सुरु करुन दिली आहे. कारखान्याने नेहमीच ऊस विकास याेजनेच्या माध्यमातून शेतकèयांचे हित जाेपासले आहे. त्यामुळे अडचणीतून मार्गक्रमण करणारी निमशिरगांवची पाणी पुरवठा पुन्हा यशस्वीपणे सुरु करण्यास कारखाना काेणतीही कसर ठेवणार नाही. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीला आवश्यक खते, पाणी व हवामान याद्वारे अधिकाधिक उत्पन्नासाठी तयार केले जाईल.
याेजना कारखान्याकडे हस्तांतर झाल्यानंतर या याेजनेचे आता जे नांव आहे तेच कायम ठेवले जाईल. एआय तंत्रज्ञानासाठी 10 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्यापैकी 50 टक्के रक्कम जवाहर कारखाना देईल. सुरुवातीला संपूर्ण 10 हजार रुपये कारखाना भरेल आणि शेतकèयांच्या हिश्श्याची 5 हजाराची रक्कम ऊस बिलातून दाेन टप्प्यात कपात करुन घेतली जाईल. ठिबक सिंचनसाठी 12 हजाराचे अनुदान शेतकèयाच्या खात्यावर जमा केले जाईल. सभासदांची येणी-देणी याबाबती माहिती घेऊन भरलेले 40 हजार रुपये संदर्भात याेग्य ताे निर्णय घेतला जाईल. 375 हेक्टर परवानगीनुसार सभासदांना पाणी देण्यास प्राधान्य देत पाणी राखीव ठेवल जाईल. त्याचबराेबर अधिक परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवाय एक्स्प्रेस िफडर मिळण्यासाठी आपण प्रयत्न करु असे सांगत कारखान्याची याेजना संदर्भातील भूमिका मांडली. या सर्व गाेष्टींचा विचार करुन सर्वांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा व कळवावे, असे श्री. आवाडे यांनी शेवटी सांगितले.
माजी खासदार तथा पाणी पुरवठा याेजनेचे चेअरमन राजू शेट्टी यांनी पाणी याेजनेचा आढावा घेताना निर्माण झालेल्या समस्या व अडचणी यांचा ऊहापाेह करत सविस्तर माहिती दिली. या याेजनेचे हस्तांतर करण्यासंदर्भात सर्वांनी मिळून निर्णय घ्यावयाचा आहे, असे सांगत जवाहर कारखान्याने या याेजना संदर्भातील आपला सविस्तर प्रस्ताव काय आहे याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. यावेळी काही सभासदांनी संस्थेचे नांव बदलणार काय, शेतीशिवाय अन्यत्र पाणी देऊ नये, वेळेवर पाणी मिळावे यासह विविध शंका व प्रश्न उपस्थित केले. त्यावर माजी मंत्री आवाडे यांनी सर्वच शंकांचे सकारात्मक निरसन केले.
यावेळी सुभाष शेट्टी, पद्माकर पाटील, सावकार मादनाईक, बाबासाे चाैगुले, सुनिल पाटील, प्रशांत कांबळे, दादासाे सांगावे, गाैतम इंगळे, संजय काेथळी, प्रकाश खाेबरे, किरण कांबळे आदींसह शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
पाणीयोजना हस्तांतरित बैठकीत बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा