ICHMH51NEWS.IN
9921600800

नदीपात्रात सूचनाफलक, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत नागरिक मंचचे निवेदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नदीपात्रात सूचनाफलक, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत नागरिक मंचचे निवेदन

इचलकरंजी
शहरातील नदीपात्रातील अपघात, भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास आणि अतिक्रमणविरोधी कारवाईत सातत्य या विविध मुद्द्यांवर इचलकरंजी नागरिक मंचाच्यावतीने आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले. उपायुक्त नंदू परळकर यांना हे निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मंचाने केली आहे.
नदीपात्रात पोहताना युवकाचा मृत्यू झाल्यानंतर इनामच्या शिष्टमंडळाने केलेल्या पाहणीत डबरा निर्माण झाल्यामुळे अंदाज न आल्याने दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून घाटाच्या डाव्या बाजूस धोकादायक क्षेत्र असल्याची माहिती देणारे सूचनाफलक तातडीने लावावेत, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाल्याचा प्रकारही मंचाने मांडला. विद्यार्थिनीला दोन्ही हाताना व डोक्याला इजा झाली असून जबड्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याअनुषंगाने मंचाने विचारले की, गेल्या ८–१० वर्षांत नसबंदी मोहिमेसाठी किती खर्च झाला आणि त्याचे परिणाम काय झाले? नसबंदी मोहिमेतील सातत्याचा अभाव हे वाढत्या हल्ल्याचे मुख्य कारण असल्याने यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शहरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेची दखल घेत, ही मोहिम संपूर्ण शहरात कायमस्वरूपी सातत्याने राबवण्यात यावी, अशीही विनंती निवेदनात करण्यात आली.
याबाबत बोलताना उपायुक्त परळकर यांनी निर्बीजीकरणात व अतिक्रमण मोहिमेत सातत्य ठेवण्यात येईल असे आश्वासन दिले.नदीपात्रात तातडीने सूचनाफलक लावण्यात येतील असेही सांगितले.
निवेदन देताना इनामचे महेंद्र जाधव, उदयसिंह निंबाळकर, अमित बियाणी,हरीश देवडिगा,दीपक पंडित,जतीन पोतदार,अभिजित पटवा उपस्थित होते.
फोटो-
उपायुक्त नंदू परळकर यांना निवेदन देताना नागरिक मंचचें सदस्य.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा