ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या तब्बल २८ विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या तब्बल २८ विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश

इचलकरंजी:
– डीकेटीई इन्स्टिटयूटमधील २८ विद्यार्थ्यांनी ‘गेट २०२५’ या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत संस्थेची गुणवत्तेची परंपरा पुन्हा सिध्द केली आहे.  गेट परिक्षेतील यशामुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि सरकारी क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये टेक्स्टाईल विभागातील ११, इएनटीसी विभागातील १, सिव्हिल इंजिनिअरींगमधील २, इलेक्ट्रीकल विभागातील १, कॉम्प्युटर सायन्स मधील ९ व एआयएमएल विभागातील ४ असे एकूण २८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
गेट (ग्रॅज्युएट ऍप्टीटयूड टेस्ट इन इंजिनिअरींग) ही परीक्षा आय.आय.टी. व आय.आय.एसी यांच्यामार्फत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे टेक्निकल नॉलेज, ऍनालिटीकल थिंकींग व रिसर्च ओरिएंटेड स्किल यांची चाचणी होते.  या परीक्षेव्दारे एकंदरीतच विद्यार्थ्यांचे बौध्दिक कौशल्य तपासले जाते.  या परिक्षेत यश मिळणा-यांना आयआयटी, एनआयटी आणि देशातील नामवंत संस्थामध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या तसेच डीआरडीओ, इस्त्रो, बेल, पॉवरग्रीड सारख्या संस्थामध्ये नोकरीच्या संधी प्राप्त होतात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच शासकीय सेवा आणि सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी प्राधान्य देखील दिले जाते. पदव्युत्तर शिक्षण घेवून पीएच.डी. चे शिक्षण पूर्ण करणे आणि संशोधक म्हणून करिअर करणे असा विद्यार्थ्यांचा मानस आहे.
डी.के.टी.ई. मध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गेटच्या तयारीसाठी खास प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहेत यामध्ये गेट ओरिएंटेशन प्रोग्रॅम, गेट एक्सपर्ट सेशन, मॉक टेस्ट, मॉक सिरीजचा समावेश असून विद्यार्थ्यांंना परिक्षेच्या योग्य तयारीसाठी दिशादर्शक ठरत आहेत असे प्रतिपादन संचालिका डॉ एल.एस.अडमुठे यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेमध्ये करिअर गायडन्स सेल मार्फत विविध स्पर्धा परिक्षांची तयारी आणि मार्गदर्शन करण्यात येते ज्यामध्ये युपीएसी,एमपीएससी, हायर एज्युकेशन, गेट, जीआरई इ. संदर्भात कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबीर भरविण्यात येते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडविण्याचे नविन संधीवाटे उपलब्ध झाले असून डीकेटीई विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी सदैव कटिबध्द आहे असे डॉ सपना आवाडे यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, सर्व विभागप्रमुख, कोऑर्डिनेटर, व करिअर गायडन्सचे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी – गेट परिक्षेत यश प्राप्त केलेले डीकेटीईचे विद्यार्थी 
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा