उच्च रक्तदाब सायलेंट किलर,जागरूकता करण्यासाठी गरज :इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जागतिक रक्तदाब दिवस साजरा.
इचलकरंजी:
जागतिक उच्च रक्तदाब दिवस हा एक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे हा दिवस दरवर्षी १७ मे रोजी साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे लोकांना रक्तदाबाचे महत्व सांगणे तसेच गंभीर वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होण्यावर उच्च रक्तदाबाचा परिणाम स्पष्ट करणे.आणि प्रतिबंध शोध आणि उपचारांबद्दल ज्ञान प्रदान करणे आहे.या वर्षीच्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाची थीम आहे.”तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा,तो नियंत्रित करा,जास्त काळ जगा”आहे.हि थीम कार्यक्षम उच्च रक्तदाब व्यवस्थापणासाठी आणि दीर्घ,निरोगी आयुष्य जगण्यासाठ नियमित आणि अचूक रक्तदाब वाचनांच्या महत्वाच्या गरजेवर भर देते. याच पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतो याची वेगवेगळी कारणे असू शकतात कौटूंबिक इतिहास,तणाव,चुकीचे खाणे आणि जीवनशैलीची काळजी घेणे.आवश्यक नाही,तर तणाव कमी करण्यासाठी आणि शरीर सक्रिय ठेवण्यासाठी व्यायाम देखील खूप आवश्यक आहे असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.भाग्यरेखा पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच रुग्णालयाचे भिषक डॉ आशिष घाटगे डॉ रश्मी कुलकर्णी यांनी सुद्धा जागतिक उच्च रक्तदाब दिनाबद्दल उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाप्रसंगी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित सोहनी सर,रुग्णालयाच्या सहा.अधिसेविका श्रीम.सीमा कदम मॅडम सर्व परीसेविका अधिपरिचारिका रुग्णालयीन कर्मचारी रुग्ण सुरक्षा रक्षक व नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले व परीसेविका श्रीम.चंदनशिवे यांनी मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







