ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा शुभारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा शुभारंभ

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘घर घर संविधान’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.

महानगरपालिकेच्या कर विभागाच्या माध्यमातून, घरफाळा भरलेल्या मिळकतधारकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत वितरित करण्यात येत आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून, सोमवार दि. २ जून रोजी आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही मिळकतधारकांना उद्देशिकेची प्रत प्रदान करून उपक्रमाची सुरुवात झाली.

या कार्यक्रमास उपायुक्त नंदू परळकर, नुतन उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त विजय राजापुरे, रोशनी गोडे तसेच सुनील बेलेकर यांची उपस्थिती होती.

महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची जाणीव प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा या मागचा उद्देश आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा