डीकेटीई एम.बी.ए.च्या २७ विद्यार्थ्यांची डि – मार्ट मध्ये निवड
इचलकरंजी:
डीकेटीईच्या एम.बी.ए. विभागातर्फे डि-मार्ट या कंपनीतर्फे पूल कॅम्पस आयोजित करण्यात आला होता. या कंपनीच्या प्लेसमेंटसाठी पाच महाविद्यालयातील सुमारे १५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. यामध्ये डीकेटीईच्या एमबीए विभागाच्या २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना डिपार्टमेंटल मॅनेजर या पोस्टसाठी निवड झाली आहे.
डीकेटीई मध्ये गुणवत्ताधिष्ठित व्यवस्थापन शिक्षणावर भर दिला जात असून, इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन, व्यावसायिक कार्यशाळा आणि कॅम्पस ड्राईव्ह यांसरख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवले जाते. विविध नामांकित उदयोगसंस्थांशी विभागाने केलेल्या सामंजस्य करारांमुळे विद्यार्थ्यांना थेट इंडस्ट्री एक्स्पोजर मिळतो.
डि-मार्ट ही भारतातील आघाडीची रिटेल कंपनी असून देशभरात तिची ४०० हून अधिक डिपार्टमेंटल स्टोअर्सची साखळी आहे. डीमार्टतर्फे एच.आर., सर्कल हेड, ऑपरेशन्स यांचे पदाधिकारी यांनी दोन फे-यामध्ये विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली. पहिल्या फेरीमध्ये ऍप्टीटयूट टेस्ट घेवून ९५ विद्यार्थ्यांना निवडण्यात आले दुसरी फेरीमध्ये मुलाखती घेवून डीकेटीईच्या २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या निवडीबदल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख प्रा.पी.एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. सदरच्या प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर ए.एस.गणपते यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळी – डीकेटीईचे एमबीए विभागातील डि-मार्टमध्ये निवड झालेले २७ विद्यार्थी
Advt
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800